12 January 2017 : एका वर्षानंतरचे ‘विद्योदय’

१ वर्षानंतर ….

युवा दिनाच्या शुभेच्छा !

१२ जानेवारी स्वामी विवेकानंद याचा  जन्म दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं महत्त्व ओळखून गेल्या वर्षी आम्ही युवक मित्रांनी एकत्र येऊन समाजातील कोणत्या तरी एका प्रश्नावर काम करावे, हा हेतू ठेवून विद्योदय मुक्तांगण परिवार या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. 

आज एक वर्ष पूर्ण झाले. मागील एका वर्षात आम्ही काय कमावले व गमावले लेखाजोखा न देता इतकंच सांगेन की, आम्ही अर्थपूर्ण जीवनाकडे प्रवास सुरु केला आहे. कदाचित या प्रवासात अर्थप्राप्ती करणे याला दुय्यम स्थान असेल.पण जे मागील एका वर्षभरात आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आवडीचा, या तिघांचा मिलाफ करून एक सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे आमच्यासाठी समाधानाचे व आनंद देणारे आहे. 

अशा प्रकारे मला काम करायचं आहे. जेव्हा मी घरी सांगितले होते तेव्हा सगळ्यांचा याला विरोध होता.आजही आहे. मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून हे काय वेड्यासारखा काम सुरु करतोय, हे काम करण्यासाठी खूप पैसा लागतो, खूप ओळख लागते, तुमच्या हातून हे होणार नाही अशा  बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आम्ही सहन केल्या, पण काम चालूच ठेवलं. 

आज एक वर्ष पुर्ण झाले. अजून भरीव असं काम करू शकलो नाही. पण तिथून पुढे रचनात्मक काम उभे करायचा संकल्प आहे. त्याचं खड्ड्यातदर वर्षी झाड लावणाऱ्या अनेकांमध्ये सामील होणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. 

सध्या प्रत्यक्ष रित्या २ केंद्र मध्ये ११० मुले आपल्या ‘रविवार कौशल्य शाळे’त वर्षभरासाठी शिकत आहेत. 

३२७ विद्यार्थांनी ‘हस्ताक्षर सुधार कार्यशाळे’चा लाभ घेतला आहे. 

उसतोडी मजुरांच्या मुलांसाठी ‘हंगामी साखर शाळां’मध्ये ३० विद्यार्थी शिकत आहेत. शिवाय कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सहा ‘जिल्हा परिषदेच्या शाळां’मध्ये २ दिवसीय ग्रामीण जीवन कौशल्य कार्यंक्रम झाले आहेत. 

वरील सगळी कामे आपल्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. ही ईश्वरीय काम करण्याची प्रेरणा अशीच मिळत राहो..

Published by VMPF

Vidyoday is an organisation started by like minded youth with an aim to reforming society through innovations in education. We believe that in order to come up with a long term solution for contemporary problems, the society is waiting for a much needed reform in education which has the capacity to reach each individual and shape the entire society

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: