12 January 2020 : ‘विद्योदय’ चार वर्षांचे झाले . .

४ वर्षे पूर्ण होताना .. 

युवा दिनाच्या शुभेच्छा !

१२ जानेवारी, २०१६ सुरु केलेला प्रवासाला आज चार वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात अनेक चढउतार आले, पण आम्ही हे शिक्षणातील प्रयोग चालूच ठेवले आहेत. यातील काही प्रयोग सिद्ध होऊ पाहत आहेत ते काही अजून कच्च्या स्वरुपातून आकार घेत आहेत. 

परत दरवर्षीचा प्रश्न ! या प्रवासात गमावले व कमावले यापेक्षा योग्य मार्गावर धीम्या गतीने प्रवास चालू आहे आणि तो चालू रहावा यासाठी माझ्यावर प्रेम करणारे असंख्य मार्गदर्शक, वडीलधारी मंडळी, मित्रमंडळी हे काम करण्याचे बळ देत आहेत.

सन २०१९ या सालातील कामाचा थोडक्यात लेखाजोगा पुढील प्रमाणे :

डॉ. अब्दुल कलाम बालआनंद निकेतन प्री पायमरी स्कूल, इचलकरंजी – 

आतापर्यंतचा कामाचा अनुभव हा पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावरील मुलांच्या  शिक्षणातील प्रयोगाची सुरुवात चालू होती. इचलकरंजी भागातील यंत्रमाग कामगारांच्या छोट्या मुलांबरोबर म्हणजेच शिशु गटाबरोबर काम करू, या हेतून पूर्व प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो तितका यशस्वी झाला नाही. पण  या शैक्षणिक वर्षात नव्या जोमाने शाळेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

सावी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँण्ड मॅथ्स – 

माझे गुरु संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल लाट केंद्रातील रविवार कौशल्य शाळेच्या माध्यमातून २ वर्षात संपर्कात राहिलेल्या गरीब व हुशार १५ मुंलासाठी ( सुपर १५ ) इयत्ता १० वीचे विज्ञान व गणित यांचे मार्गदर्शन वर्ग सुरु केले आहेत. या प्रत्येक मुलाला ९० % च्या वर मार्क मिळवण्यासाठी वर्षभर प्रयvत्न केले गेले आहेत. (अब्दुल्लाटचे सुपर ३० पोस्ट लिंक)

ज्ञानदीप प्रकल्प ( अंतर्गत ग्रामीण शिक्षा परिवर्तन (GSP) फेलोशिप ) – 

मागील वर्षी २ शाळांमध्ये राबिण्यात आलेला GSP फेलोशिप कार्यक्रम विद्यार्थी विकास प्रबोधिनी (बालोद्यान)  व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ५ गावातील ८ शाळांमध्ये राबिण्यात येत आहे. यात सध्या २०० मुलांचे शैक्षणिक दत्तक पालकत्व घेतले आहे. शाळेच्या आधी व नंतर मुलांना जीवन गणित, जीवन विज्ञान व जीवन कौशल्य हे विषय शिकवले जातात. मा. कुलभूषण बिरनाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप प्रकल्पाची वाटचाल सुरु आहे. 

युवाचेतना शिबीर – 

सालाबादप्रमाणे मागील वर्षी ५ वे युवा चेतना २ दिवसीय जिल्हास्तीय युवा चेतना शिबीर बालोद्यान बालगृहात संपन्न झाले. यात इचलकरंजी व शिरोळ तालुक्यातील परिसरातील ४० युवकांनी सहभाग घेतला. 

चिमणीचा थेंब बनू – महापूर मदतकार्य – 

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात विविध सामाजिक संस्था , मित्रमंडळी यांच्या सहकार्यातून १९३० तासश्रमदान व १५०७ कुटुंबांना जीवानावश्यक साहित्य, २४१ विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य मदत, १० शाळांना प्रत्येकी १०० पुस्तकांचे ग्रंथालय मदत करण्यात आली. ३ शाळांना विज्ञान पेटी देण्यात आली.

रविवार कौशल्य शाळा – 

इचलकरंजी केंद्रात शालेय मुलांसाठीची रविवार कौशल्य शाळा सुरु आहे. यात २० मुलांना जीवन कौशल्यांचे  मार्गदर्शन दिले जाते. 

आम्ही उद्याचे पाईक – कलेतून साधू राष्ट्रभक्ती पथनाट्य – 

ज्ञानदीप प्रकल्प व इचलकरंजी रविवार कौशल्य शाळा मुलांनी यावर्षी ३० पथनाट्याचे प्रयोग करून सुमारे ६०००  लोकांसमोर विविध सामाजिक विषयांची मांडणी केली. 

सेवांकुर साखर शाळा – 

मागील वर्षाचा अनुभव घेता ऊस तोड मजूरांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी येत्या वर्षी २ केंद्रे अब्दुल लाट व शिरदवाड गावात सुरु करण्यात आली आहेत. याचा ४० मुले लाभ घेत आहेत. 

कौशल्य विकास कार्यक्रम – 

हस्ताक्षर सुधार कार्यशाळा : अब्दुल व इचलकरंजी परिवारातील ५४० मुलांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे. 

शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा व संमेलन  – 

नवी मुंबई महानगरपालिकातील learning links सहयोगी संस्थेद्वारे  ५५ शिक्षकाचे क्षमता संवर्धन कार्यशाळा घेण्यात आली व मा. इद्रंजित देशमुख काकांची यांच्या मार्गदर्शनाखाली घारेवाडी येथे  ३५० शिक्षकांचे गुरुजन हृदय संमेलन घेण्यात आले. 

कामाची दखल –

 पुणे येथील ‘तुम्ही आम्ही पालक’ मासिकाचे संपादक हरीश बुटले यांच्या जडण घडण मासिकात विद्योदयच्या कामाची दखल घेण्यात आली. तर शाहुवाडी शैक्षणिक व्यासपीठचे मासिक ज्ञानयात्री मासिकासाठी इद्रजित देशमुख साहेब यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. 

ज्ञानसेतू शिक्षण अभ्यास दौरा – 

मराठवाडा व कोकण भागातील १० उपक्रमशील शाळा  व संस्था पाहून त्या मुलाबरोबर विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. त्याचा ३०० मुलांनी लाभ घेतला. 

 नॉट फॉर प्रॉफिट कंपनी अँक्ट (section -8 ) अंतर्गत नोंदणी– 

विद्योदय मुक्तांगण परिवार या संस्थेची नोंदणी नॉट फॉर प्रॉफिट कंपनी अँक्ट (section – 8) अंतर्गत विद्योदय मुक्तांगण परिवार फौडेशन या नावाने करण्यात आली.

विशेष सन्मान – 

सेवाभारती, इचलकरंजी कडून पूरग्रस्त मदत कार्यसाठी सेवासंगम विशेष सन्मान करण्यात आला. तर ऊस तोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करत असलेल्या कामाबद्दल अब्दुल लाट पत्रकार संघाकडून माजी परराष्ट्र सचिव मा. ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. 

२०१९ हे वर्ष खूप काही शिकवून गेले . पुढील प्रवासात आपली साथ मोलाची, 

सार्शा विनायक ,

 विद्योदय मुक्तांगण परिवार,अब्दुल लाट

Published by VMPF

Vidyoday is an organisation started by like minded youth with an aim to reforming society through innovations in education. We believe that in order to come up with a long term solution for contemporary problems, the society is waiting for a much needed reform in education which has the capacity to reach each individual and shape the entire society

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: